देवनील विद्यालयाचे राजेश सावरकर यांना विमाशिचा उत्कृष्ट मुख्याध्यापक पुरस्कार
आ.सुधाकर अडबाले,माजी आ.व्ही.यु.डायगव्हाणे यांच्या हस्ते सन्मानित
मूल:- तालुक्यातील टेकाडी येथील देवनील विदयालयाचे मुख्याध्यापक राजेश सावरकर यांना विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा उत्कृष्ट मुख्याध्यापक पुरस्कार मिळाला. चंद्रपूर येथे शिक्षक दिनानिमित्त झालेल्या जिल्हा आदर्श शिक्षक सन्मान सोहळा- 2025 पुरस्कार वितरण समारंभात शिक्षक आमदार सुधाकर अडबाले,माजी आमदार व्ही.यु.डायगव्हाणे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि शाल, श्रीफळ देवून त्यांचा गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक राजेश सावरकर हे एक उपक्रमशिल मुख्याध्यापक म्हणून ओळखले जातात. विदयार्थी प्रिय असलेले सावरकर सर प्रशासकीय कामकाज,शालेय कामकाज तसेच शैक्षणिक,सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात.शैक्षणिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवून त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहेत. मुख्याध्यापक पदाला साजेसे असे काम त्यांच्या हातून नेहमीच होत असते. देवनील विदयालयातील वर्ग 10 वीच्या निकालाची उत्कृष्ट पंरपरा त्यांनी कायम ठेवली आहे.गुणवत्ताधारक विदयार्थी घडविण्याकडे त्यांचा कल असतो.त्यामुळे त्यांच्या शाळेतील विदयार्थी तालुक्यातून बाजी मारतात. शाळेतील विविध उपक्रम त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण करून जिल्हयात शाळेचे नाव उंचावण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी आणि इतर अनेक प्रशासकीय कार्यक्रमात त्यांचा हिरीरीने सहभाग असतो.मनमिळावू स्वभावाचे राजेश सावरकर जनमानसात सुदधा तितकेच प्रिय आहेत. मार्गदर्शक,उत्तम वक्ता आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची शिक्षण क्षेत्रात ओळख आहे. उत्कृष्ट मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबददल विदयासागर शिक्षण प्रसारक मंडळ,मूल तथा माजी आमदार देवराव भांडेकर,डॉ.भांडेकर,विदयालयातील शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी,मुख्याध्यापक संघ,शिक्षक संघ,शिक्षकेत्तर कर्मचाारी संघ, मित्र परिवार आणि पालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.