मूल नगर पालिकेवर कॉंग्रेसचा झेंडा
घवघवीत यश,एकता समर्थ नगराध्यक्ष पदासाठी विजयी,सर्वत्र विजयी जल्लोष
मूल:- तब्बल नऊ वर्षानंतर झालेल्या मूल नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसला घवघवीत यश संपादन करता आले. पालिकेवर कॉंग्रेसचा एक हाती झेंडा फडकल्याने सर्वत्र विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. याआधी मूल नगर पालिकेवर भाजपाची सत्ता होती.क्षेत्रात भाजपाचे जेष्ठ नेते,धुरंधर राजकारणी,दूरदृष्टीकोनाचे विकास पुरूष सुधीर मुनगंटीवार आमदार असतानाही मूल मध्ये झालेले परिवर्तन भाजपासाठी धोक्याची घंटा ठरली आहे. नगर पालिकेतील कॉंग्रेसच्या यशा मुळे कॉंग्रेससाठी विजय आपलाच ठरला आहे. कॉंग्रेसच्या गोटयात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र जल्लोष साजरा केल्या जात आहे.
नगराध्यक्ष पदासाठी कॉंग्रेसच्या एकता प्रशांत समर्थ या भरघोष मतांनी विजयी झाल्या.त्यांना 7945 मते मिळाली. भाजपाच्या प्रा.डॉ.किरन किशोर कापगते यांना दारूण पराभव स्वीकारावा लागला.त्यांना 5873 मते मिळाली.तब्बल 2081 मतांनी एकता समर्थ विजयी ठरल्या. तिस-या क्रमांकावर बसपाच्या चैताली मल्हारी मद्रीवार या ठरल्या.त्यांना 512 मते मिळाली. नगराध्यक्ष पदासाठी जनतेतून थेट निवडणूक घेण्यात आली.जनतेने कॉंग्रेसच्या एकता प्रशांत समर्थ यांच्या बाजूने कौल दिला. प्रशांत समर्थ यांची लोकप्रियता,कॉंग्रेसमय वातावरण,कॉंग्रेसमध्ये असलेली एकजूट,भाजपाविरूदध असलेली असंतोषाची लाट,प्रदेश महासचीव संतोष सिंह रावत,आ.विजय वडेटटीवार यंाचे दमदार नेतृत्व,योग्य नियोजन,कार्यकर्त्यांचा उत्साह आणि परिवर्तनाच नांदी यामुळे एकताला सहज विजय मिळवता आला. नगरसेवक पदासाठी वीस पैकी 18 जागा जिंकता आल्या. फक्त दोनच जागांवर भाजपाला समाधान मानावे लागले.
कॉंग्रेसचे नगरसेवक पदासाठी विजयी उमेदवारांचे नाव
प्रभाग क्रमांक 1 अ:- काजल दिपक धारणे
मिळालेली मते:-861
पक्ष:- कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 1 ब:-प्रशांत विलास समर्थ
मिळालेली मते:-973
पक्ष:- कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 2 ब:-तुकाराम पुंडलिक गुरनूले
मिळालेली मते:-616
पक्ष:- कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 3 अ:- शालू किसन शेरकी
मिळालेली मते:-665
पक्ष:- कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 3 ब:-मिथून प्रकाश गददेवार
मिळालेली मते:- 960
पक्ष:- कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 4 अ:- राकेश यादवराव रत्नावार
मिळालेली मते:- 790
पक्ष:- कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 4 ब:-उज्वला अंकूश कामडी
मिळालेली मते:- 663
पक्ष:- कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 5 ब:- रितीक दिनेश गोयल
मिळालेली मते:- 807
पक्ष:-कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 6 अ:- विवेक बळवंतराव मुत्यलवार
मिळालेली मते:- 825
पक्ष:- कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 6 ब:- नलिनी दिनेश आडेपवार
मिळालेली मते:- 796
पक्ष:- कॉग्रेस
प्रभाग क्रमांक 7 अ:- अशोक हिरामण येरमे
मिळालेली मते:- 728
पक्ष:- कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 7 ब:- समिक्षा जगदीश कडस्कर
मिळालेली मते:- 553
पक्ष:-कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 8 अ:-अतूल रवी गोवर्धन
मिळालेली मते:- 667
पक्ष:-कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 8 ब:-ज्योती चंद्रकांत चटारे
मिळालेली मते:- 939
पक्ष:- कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 9 अ:- ललिता सुरेश फुलझेले
मिळालेली मते:- 596
पक्ष:- कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 9 ब:-विलास पांडूरंग कागदेलवार
मिळालेली मते:- 475
पक्ष:- कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 10 अ:-सुशीला डेव्हीड खोब्रागडे
मिळालेली मते:- 867
पक्ष:- कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 10 ब:-राहूल सुरेश प्रेमलवार
मिळालेली मते:- 854
पक्ष:- कॉंग्रेस
मूलच्या विकासासाठी सभागृहात आवाज उठवेन – आ.विजय वडेटटीवार
मूल:- भाजपाचा दारूण पराभव करीत नगर पालिकेतील घवघवीत यशानंतर येथील गांधी चौकात कॉग्रेसची विजयी सभा पार पडली.सभेला आ.विजय वडेटटीवार यांनी उपस्थित राहून संबोधीत केले.मूलवासियांनी विकासाची चिंता करू नये. मूल नगर पालिकेच्या विकासाठी प्रसंगी विधानसभेच्या सभागृहात आवाज उठवू , असे खणखणीत प्रतिपादन केले.कार्यकर्त्यांच्या बळावर हे यश मिळाले असून विजयी उमेदवारांनी कार्यकर्त्यांना ,मतदारांना विश्वासात घेवून विकासात्मक धोरण राबवावे असे आवाहन केले.चंद्रपूर जिल्हयात नगर पालिका निवडणुकीत कॉंग्रेला मोठे यश संपादन करता आले.त्यामुळे कॉंग्रेस कधी संपणार नाही.मतदारांचा कॉंग्रेस वरील विश्वास अधीक दृढ होत आहे.या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही.ही विजयाची मालिका चंद्रपूर महानगर पालिकेत सुदधा कायम राहील अशी ग्वाही आ.विजय वडेटटीवार यांनी दिल.टायगर अभी जिंदा है… असे म्हणत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.मूल ही स्व. मा.सा.कन्नमवार यांची कर्मभूमी आहे. कन्नमवारांच्या कर्मभूमीतील कॉंग्रेसच्या विजयाची मुहूर्तमेढ अख्या महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना नगराध्यक्ष पदाच्या विजयी उमेदवार एकता प्रशांत समर्थ यांनी एकता हे नाव सार्थक करून दाखवेन.सर्व समाज घटकांना विश्वासात घेवून मूल च्या विकासाला प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे मत व्यक्त केले.मतदारांच्या विश्वासाला तडा जावू न देता योग्य प्रशासन चालविण्याची हमी त्यांनी यावेळी दिली.यावेळी माजी आ.देवराव भांडेकर, प्रदेश महासचिव संतोष सिंह रावत,राकेश रत्नावार,प्रशांत समर्थ यांनी आपले मत व्यक्त केले. विजयी उमेदवाराचा आ.विजय वडेटटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विजयी उमेदवारांनी महात्मा गांधीजींच्या पुतळयाला प्रथमता अभिवादन केले. विजयी सभेचे संचालन संजय पडोळे यांनी केले. यावेळी कॉंग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.पोलिस बंदोबस्त चोख होता.

मूल मध्ये भाजपात असलेली अंतर्गत गटबाजी मतदारांच्या निदर्शनास पडली.येथील भाजपामध्ये स्थानिक दमदार नेतृत्वाचा अभाव दिसून आला. पालिका निवडणूक आ.सुधीर मुनगंटीवार यांच्याच खांदयावर लादल्या गेली.आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या विकास कामांचा गुणगौरव प्रचार सभेत नेहमी करण्यात आला. नगरसेवक पदासाठी उमेदवार निवडीत झालेली चूक भाजपाच्या अपयशात परावर्तीत झाली. आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात आपला सहज विजय होईल असे भाजपाच्या उमेदवारांमध्ये असलेली महत्वाकांक्षा मतदारांनी खोटी ठरली.
जागृत मतदारांनी योग्य उमेदवार कोण ? याचा निर्भिड,निःपक्षपणे विचार केला.त्यामुळे मूल नगर पालिका निवडणुकीतील गणित बदलले. वार्डावार्डातील चित्र बदलले. कॉंग्रेसने नव्या दमाचे शिलेदार निवडणुकीत उतरवल्याने विजयाची हवा सर्वत्र पसरली. स्थानिक नेतृत्व दमदार असल्याने कॉंग्रेसला विजयाचा धागा बरोबर बांधता आला. मूलच्या नगराध्यक्षा म्हणून एकता प्रशांत समर्थ यांची निवड झाल्याने त्यांच्यासह कॉंग्रेसच्या सर्व विजयी उमेदवारांचे सर्वत्र हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.वार्डावार्डात विजयी रॅली काढून मोठा जल्लोष होत आहे.मूल मध्ये सर्वत्र नगर पालिका निवडणुकीच्या माध्यमातून येथील वातावरण कॉंग्रेसमय झाले आहे.
कॉंग्रेसचे नगरसेवक पदासाठी विजयी उमेदवारांचे नाव
प्रभाग क्रमांक 1 अ:- काजल दिपक धारणे
मिळालेली मते:-861
पक्ष:- कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 1 ब:-प्रशांत विलास समर्थ
मिळालेली मते:-973
पक्ष:- कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 2 ब:-तुकाराम पुंडलिक गुरनूले
मिळालेली मते:-616
पक्ष:- कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 3 अ:- शालू किसन शेरकी
मिळालेली मते:-665
पक्ष:- कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 3 ब:-मिथून प्रकाश गददेवार
मिळालेली मते:- 960
पक्ष:- कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 4 अ:- राकेश यादवराव रत्नावार
मिळालेली मते:- 790
पक्ष:- कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 4 ब:-उज्वला अंकूश कामडी
मिळालेली मते:- 663
पक्ष:- कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 5 ब:- रितीक दिनेश गोयल
मिळालेली मते:- 807
पक्ष:-कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 6 अ:- विवेक बळवंतराव मुत्यलवार
मिळालेली मते:- 825
पक्ष:- कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 6 ब:- नलिनी दिनेश आडेपवार
मिळालेली मते:- 796
पक्ष:- कॉग्रेस
प्रभाग क्रमांक 7 अ:- अशोक हिरामण येरमे
मिळालेली मते:- 728
पक्ष:- कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 7 ब:- समिक्षा जगदीश कडस्कर
मिळालेली मते:- 553
पक्ष:-कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 8 अ:-अतूल रवी गोवर्धन
मिळालेली मते:- 667
पक्ष:-कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 8 ब:-ज्योती चंद्रकांत चटारे
मिळालेली मते:- 939
पक्ष:- कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 9 अ:- ललिता सुरेश फुलझेले
मिळालेली मते:- 596
पक्ष:- कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 9 ब:-विलास पांडूरंग कागदेलवार
मिळालेली मते:- 475
पक्ष:- कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 10 अ:-सुशीला डेव्हीड खोब्रागडे
मिळालेली मते:- 867
पक्ष:- कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 10 ब:-राहूल सुरेश प्रेमलवार
मिळालेली मते:- 854
पक्ष:- कॉंग्रेस
भाजपाचे नगरसेवक पदाचे विजयी उमेदवार
प्रभाग क्रमांक 2 अ:-अश्विनी रूपेश निकोडे
मिळालेली मते:-778
पक्ष:- भाजपा
प्रभाग क्रमांक 5 अ:-प्राची आनंद आक्केवार
मिळालेली मते:-734
पक्ष:- भाजपा
कॉंग्रेसची विजयी सभा