*गॅस सिलेंडरच्या मागणीसाठी शेकडो काँग्रेसच्या महिला उतरल्या रस्त्यावर, निदर्शन व धरणे आंदोलन*
*मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात येईल. नवीन गॅस एजन्सी प्रस्ताव त्वरित त्वरित पाठविण्यात येईल* *तहसीलदार मृदुला मोरे*
मूल – गेल्या दोन महिन्यापासून मुल शहरात गॅस सिलेंडर साठी महिला व नागरिकांना रांगेत उभे राहण्याची पाळी आली. मूल येथील एजन्सी बंद झाल्याने सिलेंडरचा तुटवडा भासत आहे. अनेकांना चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. ही गंभीर व जीवनावशक समस्या लक्षात घेऊन तालुका महीला काँग्रेस कमिटी तर्फे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संतोषसिंग रावत यांच्या नेतृत्वात शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या व गांधी चौक मुल येथे निदर्शने,धरणे आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात नगराध्यक्ष एकता समर्थ,सभापती शहर अध्यक्षा नलिनी अडपवार, सभापती लीना फुलझेले,तालुका अध्यक्षा रुपाली संतोषवार, माजी.जी.प.सदस्य मंगला आत्राम,संचालक चंदा कामडी, मा.सभापती वैशाली पुलावार, ज्योती चटारे, वार्डातील महिला, शामला बेलसरे, मैथिली हेडाऊ यांनी समस्या मांडल्या. व मागण्याचे निवेदन तहसीलदार मृदुला मोरे यांना देण्यात आले. *१) मूल येथील गॅस एजन्सी त्वरित सुरु करावी २) सिलेंडरचे वाटप केंद्र वाढवावे ३) ग्राहकांना नियमित घरपोच सिलेंडर पोहचता करावे ४) मूल शहरात ४५ दिवसाची दिलेली मुदत रद्द करून २५ दिवसाची करावी ५)गॅस सिलेंडरचे भाव कमी करावे ६) शहर व तालुका मिळून नवीन गॅस एजन्सी सुरु करण्याबाबत पुढील कार्यवाही करावी* अशा मागण्या करण्यात आले.यावर तहसीलदार मृदुला मोरे यांनी येत्या १० दिवसात जुनी एजन्सी सुरु होईल, सिलेंडर वाटप केंद्र वाढविण्यात येईल,प्रत्येक ग्राहकाला सिलेंडर मिळेल.अशी व्यवस्था प्रशासन करीत असल्याचे आश्वासित केले.
आंदोलनात उपाध्यक्ष राकेश रत्नावर, सभापती प्रशांत समर्थ, तालुका अध्यक्ष गुरु गुरुनुले,शहर अध्यक्ष सुनील शेरकी, महासचिव घनश्याम येनुरकर,उपाध्यक्ष राजू पाटील मारकवार, संचालक संदीप कारमवार, किशोर घडसे, सभापती विलास कागदेलवार, अतुल गोवर्धन, विवेक मुत्त्यलवार,नितीन गद्देवार, तुकाराम गुरुनुले,अशोक येरामे , बंडू गुरुनुले, राहुल प्रेमलवार, सुशीला खोब्रागडे, उपसभापती समीक्षा कडसकर, शालु शेरकी , उज्वला कामडे, भूमिका मडावी, श्वेता शेरकी, माधुरी गुरनुले, वैशाली घुगरे, सुरेश फुलझेले, प्रा.प्रभू धोटे, गुरुदास चौधरी, हसन वाढई, कैलास चलाख, चंदु चटारे, डेव्हिड खोब्रागडे,जगदीश कडसकर, किसन शेरकी,भास्कर खोब्रागडे, शिवम चलावार,मंगेश बत्तुलवार, संदीप वाढई, कृष्णा बोरेवार, सलीम कुरेशी,यांचे सह शेकडो महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.




