मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा
माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे यांची मागणी
अन्यथा आंदोलनाचा ईशारा
मूल:- शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला आहे.कळपाने बसणा-या या जनावरांमुळे मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.अशा मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथिल नगर पालिकेचे माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे यांनी केली आहे.त्यांनी भाजपाच्या वतीने एक निवेदन नगर पालिकेला देण्यात आले.मोकाट जनावरांचा बंदोबस्त नाही झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. मूल येथील गांधी चौक ते चंद्रपूर रोड,नागपूर रोड,सोमनाथ रोड आणि विश्राम गृह रोडवर मोकाट जनावरे मोठया संख्येने कळपच्या कळप रस्त्यांवर आपला ठिया मांडून बसून असतात. भरधाव वेगाने धावणा-या वाहनांची सुदधा त्यांना भिती वाटत नाही. काही जनावरे लढाईत भिडलेले असतात.त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनाना मोठा त्रास सहन करावा लागतो.प्रसंगी अपघाताला सुदधा सामोरे जावे लागते.दिवस रात्र मुख्य रस्त्यांवर आणि अंतर्गत रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिया ठाण मांडून राहत असल्याने शालेय विदयार्थ्यांनाही याचा मोठा फटका बसलेला आढळून येत आहे.मोकाट जनावरांमुळे गंभीर अपघात होण्याची भिती नंदू रणदिवे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नगर पालिकेने मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी एका निवेदनातून त्यांनी केली आहे. गंभीर समस्यांची नगर पालिकेने दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. निवेदनाप्रसंगी अनिल साखरकर,राकेश ठाकरे,प्रशांत बोबाटे,सुधीर भोयर,राहूल जिरकुंटवार,आशिष गुंडावार,गोपाल बल्लावार तथा वार्डातील ग्रामस्थ उपस्थित होते.
कोंडवाडा काय कामाचा:- मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी मूल मध्ये कोंडवाडा आहे.तो कोंडवाडा काय कामाचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.मागिल महिण्यात नगर पालिकेने मोकाट जनावरांना पकडून कोंडवाडयात कोंबले होते.त्यानंतर ये रे माझया मागल्या,अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.कोंडवाडा रिकामा आहे आणि मोकाट जनावरे रस्त्यांवर बिनधास्त ठिया मांडून बसली आहे.मोकाट जनावरांमुळे राज्यात ठिकठिकाणी गंभीर अपघात झाले आहे.प्रसंगी जीव सुदधा जाण्याची भिती आहे.अशा प्रसंगी पालिकेची मुख्य जबाबदारी असताना सुदधा मोकाट जनावरांचा बंदोबस्त का करू नये ,असा सवाल केल्या जात आहे.पालिकेच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र असंतोषाची भावना निर्माण होत आहे.
मोकाट कुत्रे आणि डुकरे यांचाही प्रश्न गंभीर:- मोकाट जनावरांच्या पाठोपाठ मूल शहरात मोकाट कुत्रे आणि डुकरे यांचाही प्रश्न गंभीर बनत चालला आहे.मुख्य रस्त्यांवर आणि पालिकेच्या अंतर्गत रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांची टोळी हैदोस घालताना दिसत आहे. पावसाळयाचे दिवस असल्याने मोकाट कुत्र्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे.अशा परिस्थितीत नगर पालिका मोकाट जनावरे आणि प्राण्यांविषयी गंभीर का नाही,असा जनतेचा सवाल आहे.मध्यंतरी पालिकेने मोाकाट कुत्रे आणि डुकरे पकडण्याची मोहीम हाती घेतली होती.तशी मोहिम पालिकेने हाती घ्यावी आणि मूल वासियांना भयमुक्त करावे अशी मागणी होत आहे.शहरात माकडांचा सुदधा मोठया प्रमाणात हैदोस वाढला आहे.दोन दिवसाआड माकडाच्या फे-या होत असल्याने स्थानिक रहिवासी मोठया प्रमाणात वैतागले आहे.हैदोस घालणा-या माकडांमुळे नागरिकांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.
प्रशासकांचे दुर्लक्ष :- मूल नगर पालिकेवर प्रशासक राज आहे.शहरात मोठया प्रमाणात अनेक समस्या उदभवल्या असताना त्याकडे प्रशासकांचे दुर्लक्ष होत आहे. शहरातील अनेक भागात पथदिवे बंद आहेत. काही अंधारांचे साम्राज्य आहे.त्यामुळे कुत्र्यांचे साम्राज्य वाढले आहे.तदवतच मोकाट जनावरे रस्त्यांवर बसून राहतात.अंधाराच्या साम्राज्यामुळे स्थानिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ठिकठिकाणी सौंदर्यीकरणाच्या नावाखाली उभारण्यात आलेल्या कारंज्यामध्ये पावसाचे पाणी साचून डबके तयार झाले आहे.अशा पाण्यात डासांचा प्रार्दूभाव वाढल्यास नवल वाटायला नको.सौदर्यीकरणाच्या नावाखाली उभारलेल्या बगिच्यात कच-यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.शहरात योग्य प्रमाणात नाल्यांची सफाई झाली नाही.ठिकठिकाणी तयार झालेल्या खडयांमध्ये पावसाचे पाणी साचल्या गेले आहे.मच्छरांचा प्रार्दूभाव वाढला असतानाही धुर फवारणी नाही. पालिकेला आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत मोठया प्रमाणात फवारणी यंत्र दिल्या गेले होते.त्या यंत्राचे काय झाले ? धुर फवारणी का केल्या जात नाही ? असा प्रश्न जनता यानिमित्ताने पालिकेला विचारत आहे. याबाबत भाजपाने क्षेत्राचे आ.सुधीर मुनगंटीवार यांना पत्र दिले आहे. शहरातील अनेक समस्यांनी जनता त्रस्त झाली आहे.वैतागली आहे. जनता त्रस्त .. प्रशासकराज मस्त अशी अवस्था शहराची झाली आहे. उदभवलेल्या गंभीर समस्या सोडवणार कोण ?असा जनतेचा आवाज प्रश्न विचारत आहे.