प्रारूप मतदार यादीत घोळात घोळ – तालुका कॉग्रेस कमेटीचा  आरोप

113
प्रारूप मतदार यादीत घोळात घोळ
तालुका कॉग्रेस कमेटीचा  आरोप

मूल:- येथील तालुका प्रशासनाने तयार केलेल्या प्रारूप मतदार यादीत घोळात घोळ आहे. अनेक मतदारांची नावे दोनदा तीनदा असून मय्यत मतदारांची नावे सुदधा वगळण्यात आलेली नाही.निवडणूक आयोग आणि संबधित यंत्रणा योग्य रित्या काम करीत नसल्याचा  आरोप येथील तालुका कॉंग्रेस कमेटीने केला आहे.स्थानिक विश्राम गृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत तालुका कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष गुरूदास गुरनूले आणि शहर अध्यक्ष सुनिल शेरकी यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजाविषयी संशय व्यक्त केला आहे.निवडणूक आयोगाच्या संशसास्पद  भूमिकेमुळे भारतीय लोकशाही धोक्यात सापडली असल्याचे मत कॉंग्रेस कमेटीने व्यक्त केले. स्थानिक मूल मध्ये सुदधा 122 मतदारांची नावे मतदार यादीत अनेकदा आहेत. बल्लारपूर विधानसभा मतदार संघाच्या यादीत सुदधा 1600 नावे दोनदा आहेत. मतदार ओळखपत्र क्रमांकही वेगवेगळी आहेत. तसेच मयत मतदारंाची नावे सुदधा वगळल्या गेली नाही. मयत मतदारांची नावे प्रारूप मतदार यादी तयार करताना का वगळल्या गेली नाही ? असा प्रश्न कमेटीने केला. स्थानिक नगर पालिका निवडणुकीच्या संदर्भात तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत सुदधा घोळ  निर्माण झालेला आहे. निवडणूक आयोग आणि संबधित प्रशासन याला जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. प्रशासनाने मयत मतदारांच्या नावाची छाननी करावी,प्रारूप मतदार यादीतील चुका दुरूस्त करण्यात याव्यात,योग्य आणि व्यवस्थित अंतीम मतदार यादी तयार करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा तालुका कॉंग्रेेस कमेटीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तालुका अध्यक्ष गुरूदास गुरनूले आणि शहर अध्यक्ष सुनिल शेरकी यांनी दिला.पत्रकार परिषदेला बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार,माजी अध्यक्ष घनश्याम येनूरकर,महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा रूपाली संतोषवार,शहर अध्यक्षा नलिनी आडपवार,युवक तालुकाध्यक्ष पवन निलमवार,जिपच्या माजी सदस्या मंगला आत्राम उपस्थित होते.