दिवाळी विशेष मुलाखत – डॉ.किशोरी दांडेकर – होमीओपॅथीक वैद्यकीय सेवेला 25 वर्षे पूर्ण

529

दिवाळी विशेष

मुलाखत – डॉ.किशोरी दांडेकर
होमीओपॅथीक वैद्यकीय सेवेला 25 वर्षे पूर्ण
मूल:- मागिल 25 वर्षांपासून होमीओपॅथीक सेवेला  डॉ.किशोरी विनोद दांडेकर या योग्य न्याय देत आहेत.त्यांच्या या होमीओपॅथीक उपचार पदधतीच्या  वैद्यकीय सेवेला 2 ऑक्टोबर रोजी 25 वर्षे पूर्ण झाली. एकंदरीत रौप्य महोत्सवी वर्षे त्या साजरा करीत आहेत. अलोपॅथिक,आयुवैदीक,होमिओपॅथी यासह इतर अनेक उपचार पदधती वैद्यकीय सेवेत कार्यरत आहे.परंतु,आजकाल होमीओपॅथीक सेवेला जास्त पंसती मिळत असल्याचे डॉ.किशोरी दांडेकर म्हणतात.डॉ.किशोरी विनोद दांडेकर यांचे डी.एच.एम.एस,सीजीओ,सीसीएच असे शिक्षण झाले आहे.आंतरभारती होमीओपॅथी मेडीकल कॉलेज,दाभा,नागपूर येथून त्यांचे शिक्षण् झाले.आपणही डॉक्टर व्हावे असे त्यांना मनोमन वाटत होते.कारण,असे वातावरण त्यांच्या घरी होते.त्यांचे काका,काकू,दोन भाऊ आणि बहिण सुदधा होमीओपॅथीक डॉक्टर आहेत.त्यांच्या माहेरचे आडनाव शेंडवरे असे आहे.नागपूर जिल्हयातील कुही हे त्यांचे गाव. मूल येथील प्रसिदध डॉक्टर राम दांडेकर यांच्या त्या लहान स्नुषा. औषधी विक्रेता विनोद दांडेकर यांच्या त्या पत्नी.त्यांचे सन 2000 मध्ये लग्न झाले.2 ऑक्टोबर 2000 मध्ये मूल येथे विश्राम गृहामार्गावरील त्यांच्या राहत्या घरी होमीओपॅथीक दवाखाना सुरू केला.माहेरी आणि सासरी वैद्यकीय सेवेसाठी पोषक वातावरण असल्याचा आनंद त्यांना आहे.त्यामुळे त्या आपल्या वैद्यकीय सेवेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यांच्या दवाखान्यात अनेक रूग्ण उपचारासाठी येतात.मागिल 25 वर्षात त्यांनी होमीओपॅथीक उपचार पदधतीच्या माध्यमातून ब-याच रूग्णांना बरे केले आहे.योग्य तपासणी करून त्यांना योग्य उपचार करण्यात त्यांचा हातखंड आहे. सौंदर्य सल्ला,चर्मरोग,वातरोग,स्त्रीरोग,केस गळणे,मुळव्याध,किडणीस्टोन,वंधत्व निवारण,खोकला,दमा तसेच इतर  होमीओपॅथीक उपचार सेवा त्यांच्या कडे उपलब्ध आहेत.त्यांचे गौरी मेडीकल नावाचे औषधीचे दुकान सुदधा आहे. डॉ.सॅम्यूअल हॅनिमन हे होमिओपॅथीचे जनक.जर्मन वैद्य असलेले हॅनिमन यांनी 19 व्या शतकात होमिओपॅथीचा वैज्ञानिकदृष्टया विकास केला. आणि सर्वत्र जगभरात होमिओपॅथीक सेवेला सुरूवात झाली.विदेशात होमीओपॅथीक उपचार पदधतीला विशेष महत्व असल्याचे डॉ.किशोरी दांडेकर म्हणतात.
दुग्धशर्करा योग:- 2 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांच्या जीवनात एक दुग्धशर्करा योग आला. विनोद दांडेकर आणि डॉ.किशोरी दांडेकर या दाम्पत्यांची मुलगी कु.मिनल ही सुदधा 2 ऑक्टोबर रोजी होमीओपॅथीची परीक्षा पास झाली.अर्थात ती बीएचएमएस झाली.दांडेकर कुटुंबातील हा योगायोग वाखाणण्यासारखा आहे.एकीकडे डॉ.किशोरी दांडेकर यांच्या माहेरी अख्खे कुटुंब होमीओपॅथीक मध्ये सेवा देत आहेत.तर,दुसरीकडे सासरी सुदधा त्यांना वैद्यकीय सेवा देणारेच कुटुंब लाभले.हे विशेष !! 

श्री. विनायक रेकलवार
मुख्य संपादक- जनतेचा आवाज