प्रकाश पाटिल मारकवार यांचा आगामी मराठी चित्रपट – अग अग सुनबाई… काय म्हणताय सासूबाई… लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

310

प्रकाश पाटिल मारकवार यांचा
आगामी मराठी चित्रपट

अग अग सुनबाई… काय म्हणताय सासूबाई… लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मूल:- विनायक रेकलवार
येथील प्रसिदध चित्रपट निर्माता प्रकाश पाटिल मारकवार यांचा
आगामी मराठी चित्रपट अग अग सुनबाई… काय म्हणताय सासूबाई… लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे वितरण प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर यांच्या धर्मा प्रोडक्शन मार्फत केले जाणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे आणि निर्माता बेला शिंदे, डॉ. अशोक जीवतोडे आणि प्रकाश पाटील हे आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई येथे 23 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाले. या चित्रपटात प्रमूख भूमिकेत प्रार्थना बेहेरे आणि निर्मिती सावंत या आहेत. चित्रपट जानेवारी 2026 मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची कथा आणि लेखन वैशाली नाईक यांनी केली आहे.
यापूर्वी वैशाली नाईक यांनी लेखन केलेला बाई पण भारी देवा या चित्रपटाने 50 दिवसांमध्ये 90.50 कोटी रूपयांची कमाई केली होती. आतापर्यंतचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा हा मराठी चित्रपट ठरला. पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा व मराठी चित्रपट उद्योगासाठी एका दिवसात 6.10 कोटी पेक्षा जास्त कमाईचा नवा विक्रम देखील रचला होता.
अगं अगं सुनबाई…काय म्हणता सासूबाई…
या चित्रपटाचे निर्माता प्रकाश पाटील यांनी यापूर्वी आमच्यासारखे आम्हीच , मी तुळस तुझ्या अंगणी या चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. त्यांचा नवीन चित्रपट सुद्धा प्रेक्षकांना खूप भावेल अशी आशा प्रकाश पाटील मारकवार यांनी व्यक्त केली. प्रकाश पाटिल यांच्या नवीन चित्रपटाविषयी चंद्रपूर जिल्हयातील जनतेला मोठी उत्सूकता लागली आहे.प्रकाश पाटिल मूल तालुक्यातील राजगड येथील रहिवासी आहेत.