वाढदिवस अभिष्टचिंतन निमित्ताने
शेतकरी नेते कवडू येनप्रेडडीवार
शेतकरी नेते कवडू येनप्रेडडीवार
शेतक-यांसाठी सातत्याने चळवळीच्या माध्यमातून लढा उभारणारे लढावू वृत्तीचे शेतकरी नेते,मूल तालुका युवक बिरादरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आद.कवडू जनार्धन येनप्रेडडीवार यांचा आज ( 10 डिसेंबर )वाढदिवस. आद.काकाजी वयाची 73 वर्षे पूर्ण करून 74 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. 10 डिसेंबर 1953 रोजी त्यांचा जन्म मूल मध्ये झाला. जन्मभूमी आणि कर्मभूमीत त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. विशेष जाण आहे.
त्यांचे वडील मूल येथील ग्रामपंचायत मध्ये नोकरीवर होते.फॉरेस्ट वेंडर म्हणून त्यांचे काम होते. त्यांनतर काकाजी यांनीही मूल ग्रामपंचायत मध्ये फॉरेस्ट वेंडर म्हणून पंधरा वर्षे काम केले.चपाती,गवत,लाकूड फाटा,जळावू लाकूड याबाबत चिठठया देण्याचे काम त्यांच्या कडे होते.119 गावांचा कारभार यानिमित्ताने ते पाहायचे. चौथा वर्ग पास असलेले कवडू येनप्रेडडीवार काकाजींनी आपल्या पत्नीच्या नावाने शिक्षण संस्था उभारून गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण देण्याचे काम करीत आहेत.लक्ष्मीबाई शिक्षण संस्था अंतर्गत बालगृह ते चालवितात. त्यांच्या या सामाजिक कार्यामध्ये पत्नी लक्ष्मीबाई,मूले रूपेश,नितेश,मुली दिपाली,सोनू त्यांना हिरीरीने साथ देतात.
1984 मध्ये त्यांनी शेतक-यांच्या हितासाठी,शेतमालाच्या योग्य भावासाठी मूल तालुका युवक बिरादरी संघटनेची स्थापना केली. संघटना स्थापन करून ते मागिल 41 वर्षांपासून शेतकरी चळवळ राबवित आहेत. शेतक-यांसाठी नेहमीच त्यांचा लढावू बाणा राहिला आहे.शेतमालाच्या भावासाठी त्यांनी अनेकदा लढे उभारले. मूल तालुका धान उत्पादक पटटा आहे. धानाला भाव नाही.4500 रूपये धानाला भाव मिळावा अशी त्यांची नेहमीच मागणी राहली आहे.उत्पादनापेक्षा खर्च जास्त असल्याने धानाची शेती करणे परवडत नाही.त्यामुळे शेतमालाच्या भावासाठी अनेकदा लढे उभारून शासनाचे लक्ष त्यांनी वेधले आहे.म्हणून त्यांनी अफू,गांजांची शेती करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना एक कोटी रूप्यांची आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी त्यांची वनविभागाकडे मागणी आहे.वनजमिनीवरील अतिक्रमीत जबरोनज्योत शेतक-यांसाठी लढा त्यांचा अनेकदा गाजलेला आहे.अजूनही त्यांची जबरोनज्योत शेतक-यांसाठी असलेली चळवळ थांबलेली नाही.जो पर्यंत एखादा प्रश्न सुटत नाही ,तो पर्यंत लढावू वृत्तीचे कवडू येनप्रेडडीवार शांत बसत नाही.त्यांच्या रक्तात शेतक-यांसाठी अधिक कळवळा असल्याने त्यांचा बाणा महासागराच्या लाटांसारखा उंचच उंच उसळत असतो.
शेतक-यांचे प्रश्न त्यांनी उच्च न्यायालय,सर्वोच्च न्यायालय,राष्ट्रपती,प्रधानमंत्री,गृहमंत्री, मुख्य न्यायाधिश यांच्या पर्यंत मांडलेले आहेत. या सर्व वरिष्ठ पातळी पर्यंत त्यांचा पत्र व्यवहार सातत्याने सुरू असतो. शेतक-यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी जनहित याचिका सुदधा दाखल केलेले आहे. कवडू येनप्रेडडीवार हे प्रगतशिल शेतकरी म्हणून सुदधा परिसरात प्रसिदध आहेत.आपल्या शेतीत ते नवनवीन प्रयोग करीत राहतात.नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ते आपल्या शेतीत करीत असतात.मितभाषी असलेले कवडू येनप्रेडडीवार काहीसे कडक स्वभावाचे आहेत.शेतीतील ज्ञान अधिक अवगत आहे. त्यांना अधिक अभ्यास आहे. त्यामुळे शेतकरी नेते म्हणून काम करीत असताना ते नेहमी शेतक-यांच्या समस्या,त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतात.त्यांना संघटनेच्या माध्यमातून न्याय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतात.शेतक-यांना त्यांचा शेतमाल शेतातच ठेवता यावा यासाठी शेतक-यांना शासनाकडून गोडावून बांधून देण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे.कवडू अॅग्रो प्रोडयूसर कंपनीची स्थापना करून गोडावून बांधकामासाठी त्यांचा लढा सुरू आहे.
वेगळया विदर्भाच्या लढयातही ते सहभागी आहेत.वेगळा विदर्भ झाल्या शिवाय येथील शेतक-यांचा विकास होणे शक्य नाही असे त्यांचे ठाम मत आहे. नुकतेच त्यांनी अवयवदानाचा संकल्प केलेला आहे. मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार असल्याचे काकाजी म्हणतात. शेतकरी चळवळीतील खंदे नेते असलेल्या कवडू येनप्रेडडीवार काकाजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! वाढदिवस अभिष्टचिंतनानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभो. शेतकरी,जनसामान्यांच्या कार्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे.त्यांच्या या विशेष कार्यासाठी भरभरून सदिच्छा…!!!!
लेखक –
श्री.विनायक रेकलवार
मुख्य संपादक
जनतेचा आवाज
मूल.
8975140998
श्री.विनायक रेकलवार
मुख्य संपादक
जनतेचा आवाज
मूल.
8975140998




