वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
सावली वनपरिक्षेत्रातील बेलघाटा येथील घटना
मूल:- संरक्षित वनक्षेत्रात गुरे चराईसाठी नेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केले.ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.मृत गुराख्याचे नाव पीतांबर गुलाबराव सोयाम,वय 36,रा.बेलघाटा असे आहे. पीतांबर हा नेहमी प्रमाणे शनिवारी गावातील गुरे चराईसाठी जंगलाच्या दिशेने गेलेेला होता.संरक्षित वन क्षेत्रात कम्पार्टमंेट नंबर 1765 मध्ये गुर चरत असताना त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने पीतांबर वर हल्ला करून त्यास जागीच ठार केले.जंगलात फरफटत नेल्याने त्याचा मृतदेह इतरांच्या निदर्शनास आला नाही.मात्र, सांयकाळी गावात गुरे परत आली.पीतांबर न दिसल्याने कुटुंबीयाना शंका आली.याची माहिती सावली वनविभागाला देण्यात आली.रविवारी सकाळी वनविभागाच्या चमूंनी शोधाशोध घेतली असता जंगलालगतच्या शेतात पीतांबरचा मृतदेह आढळून आला.सावली वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला.पुढील तपास सावली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक एस.ए.नागोसे,एस.जे.आदे,बोरकर हे करीत आहेत. बेलघाटा मूल तालुक्यातील महसूली गाव असून वनक्षेत्र सावली विभागातंर्गत येते.वाघाच्या वाढत्या हल्ल्यांनी मूल तालुक्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचत आहे.
बिबटयाच्या हल्यात शेळी ठार –

मूल पासून दोन किमी अंतरावर असलेल्या उमा नदीच्या काठावर असलेल्या अंतरगाव पारडवाही येथे बिबटयाच्या हल्ल्यात शेळी ठार झाली.ही घटना रविवारी दुपारी घडली. गणेश चौखुंडे हे आपल्या घरच्या शेळया चराईसाठी उमा नदी काठावर गेले होते. त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबटयाने एका शेळीवर झडप घालून ठार केले.प्रादेशिक वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाच्या वन कर्मचा-यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.